राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा भाजपचा दणका !

निरंजन डावखरे यांचा ८११८ मताधिक्याने विजय

मुंबई: विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खुद्द उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते. मात्र तरीदेखील राष्ट्रवादीचा पराजय झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रवादीतून नुकतेच भाजपमध्ये गेलेले निरंजन डावखरे यांचा ८११८ मताधिक्याने विजय झाला. तर शिवसेनेचे संजय मोरे यांना २४८७९ मते मिळाली. आणी राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला हे १४८१९ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. डावखरे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र भाजपची खेळी यशस्वी ठरली.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1012547435619635200

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)