भाजपला 210 च्या आसपास जागा मिळतील : संजय राऊत

संग्रहित छायाचित्र

त्यापेक्षा कमी जागा मिळाल्यास पंतप्रधान ठरवण्याचा अधिकार एनडीएच्या घटक पक्षांना

मुंबई – भाजपला मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी कमी जागा मिळतील, असे भाकीत शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. भाजपला 210 च्या आसपास जागा मिळतील. 2014 मधील सरकार भाजपचे होते. आता 2019 मधील सरकार एनडीएचे असेल, असे त्यांनी म्हटले.

येथे मंगळवारी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना राऊत यांनी पुढील सरकार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे असेल, असे म्हणतानाच भाजपचे संख्याबळ घटेल, असे भाकीत करत मित्रपक्षाच्या गोटात अस्वस्थता निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. एनडीएला 300 च्या आसपास जागा मिळतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. तूर्त भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही.

मात्र, भाजपचे संख्याबळ 200 पेक्षा कमी झाल्यास पुढील पंतप्रधान कोण असावा, हे ठरवण्याचा अधिकार एनडीएच्या घटक पक्षांना मिळेल, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर राजकीय स्थिती बदलली आहे. जनतेला केंद्रात स्थिर सरकार हवे आहे. देशहित ध्यानात घेऊन शिवसेनेने भाजपशी युती केली, असेही राऊत यांनी पुढे बोलताना म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)