भाजप-तृणमूल कार्यकर्ते भिडले; एकमेकांवर फेकले गावठी बॉम्ब

कोलकाता: लोकसभा निवडणुकांपासून पश्चिम बंगालमध्ये तणावग्रस्त वातावरण आहे. निवडणूका संपून महिना संपत आला तरी हिंसाचार थांबला नाही. 24 परगाणा जिल्ह्यात एका पोलीस ठाण्याच्या उद्घाटनाच्या वेळी पुन्हा एकदा भाजप-तृणमूल कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर गावठी बॉम्ब फेकले.

या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)