बंगालला अतिसंवेदनशील राज्य म्हणून जाहीर करावे-भाजप 

राहुल गांधींवरही कारवाईची मागणी

नवी दिल्ली – भाजपने बुधवारी तृणमूल कॉंग्रेस आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधातील राजकीय लढा निवडणूक आयोगाच्या दरबारात नेला. तृणमूलची सत्ता असणाऱ्या पश्‍चिम बंगालला अतिसंवेदनशील राज्य म्हणून जाहीर करावे, असे साकडे भाजपने घातले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निराधार आरोप केल्याबद्दल राहुल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

रविशंकर प्रसाद, निर्मला सीतारामन आणि जे.पी.नड्डा या केंद्रीय मंत्र्यांबरोबरच भाजपचे बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय आदींचा समावेश असणाऱ्या भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. पश्‍चिम बंगालमधील नोकरशाही आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या तटस्थतेवर भाजपने प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. त्या राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर केंद्रीय सुरक्षा दले तैनात करण्याची मागणीही भाजपकडून करण्यात आली. पश्‍चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत. त्या राज्यात चांगली कामगिरी करण्याचा चंग बांधलेल्या भाजपने तृणमूलविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. दरम्यान, आचारसंहिता लागू असताना राहुल यांनी मंगळवारी अहमदाबादमध्ये पंतप्रधानांवर निराधार आरोप केले. त्यातून त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)