मध्यप्रदेश विधानसभा सभापतीपदाची निवडणूक भाजपही लढवणार

भोपाळ: भारतीय जनता पक्षाने मध्यप्रदेशातील सभापती पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काठावर बहुमत मिळालेल्या कॉंग्रेस सरकारच्या संख्याबळाची यानिमीत्ताने पुन्हा एकदा कसोटी लागणार आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तथापी विधानसभेचा सभापती बिनविरोध निवडण्याची प्रथा आहे ही प्रथा भाजपने पाळली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली आहे.

उद्या या पदासाठी निवडणूक होत आहे. या पदासाठी कॉंग्रेसने गोटेगावचे आमदार एन. पी. प्रजापती यांना उमेदवारी दिली आहे. तर भारतीय जनता पक्षाने विजय शहा यांना या रिंगणात उतरवले आहे. विधानसभेच्या सभापतींची निवड करण्यापुर्वी कॉंग्रेसने हंगामी सभापती नेमला नाही त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे असे भाजपने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)