सत्ताधाऱ्यांनीच पावसाळी अधिवेशन बंद पाडले; अजित पवारांची टीका

बहुमत असूनही धनगर आरक्षण प्रश्‍न सोडविता आला नाही

बारामती – धनगर आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावरून सत्ताधाऱ्यांनीच अधिवेशन बंद पाडले. यापूर्वी असे कधी घडले नव्हते. केंद्रामध्ये पूर्ण बहुमत असताना देखील धनगर आरक्षणाचा प्रश्‍न सोडविता आला नाही, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बारामती येथील शारदा प्रांगणात अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 294 व्या जयंती उत्सावा निमित्त आयोजित कार्यक्रमात पवार यांनीही टीका केली. यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, विधानपरीषदेचे आमदार ऍड. राहमरी रूपनवर, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते, पंचायत सभापती संजय भोसले, संभाजी होळकर, प्रभाकर देशमुख, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सचिन सातव, उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, प्रशांत काटे, प्रमोद काकडे, भरत खैरे आदी उपस्थित होते.

अजित पवार पवार म्हणाले, विधानपरिषद सभागृहाचे कामकाज धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधारी पक्षानेच बंद पाडले. बारा दिवसांचे अधिवेशन आहे. सत्ताधाऱ्यांना चर्चेचेने हा प्रश्‍न सोडवा, अशी मागणी आम्ही केली होती. धनगर आरक्षणाबाबत टाटा इन्स्ट्यिुटचा टाटा इन्स्ट्यिुटचा अहवाल आम्ही विधिमंडळ सदस्यांनी तो अहवाल पाहण्यासाठी मागुन देखील तो दिला नाहि. टाटा इन्स्ट्यिुटचा टाटा इन्स्ट्यिुटचा अहवाल आल्यानंतर आरक्षण देऊ असे सत्ताधाऱ्यांनीच सांगितले होत,असे पवार म्हणाले. यावेळी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या तसेच दहावी-बारावीच्या र्रीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसह सामाजिक कार्यकर्ते, स्पर्धा परीक्षेत, आयएएस आदी शासकीय परीक्षेत यशस्वी झालेल्या तरुण-तरुणींचा गौरव करण्यात आला.

आमदार ऍड. राहमरी रूपनवर म्हणाले की, आम्हाला राज्यात एनटी, देशामध्ये ओबीसी आणि घटनेमध्ये एसटी अशा प्रवर्गामध्ये आरक्षण आहे. देशामध्ये आशापद्धतीने एका समाजाला तीन प्रवर्गाची आरक्षणे कुठेच नाहीत. नियमानुसार आम्हाला घटननेने दिलेले एसटी प्रवर्गातील हवे आहे. मुख्यमंत्री सभागृहात या प्रश्‍नावरून अडचणीत येत असल्याचे दिसताच सत्ताधाऱ्यांनी कामकाज बंद पाडल्याची टीका आमदार रुपनवर यांनी केली.

धनगर आरक्षणाचा मुद्दा संसदेत मांडण्यासाठी पुढाकार घेऊ. तुमच्या खांद्याला खांदा लावून आरक्षण लढ्यासाठी उभा राहू. समाजातील वंचितांना त्यांचा अधिकार मिळणे आवश्‍यक आहे.
– डॉ. अमोल कोल्हे खासदार, शिरूर लोकसभा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)