भाजप-शिवसेनेने डॉ. सुजय विखेंसाठी नेले स्वतंत्र अर्ज

जगतापांनी घेतले तीन अर्ज : दुसऱ्या दिवशी 23 जणांनी नेले 35 अर्ज

दोन दिवसात 44 जणांनी नेले 74 अर्ज

नगर: दक्षिण लोकसभा लोकसभा मतदारसंघासाठीची अधिसूचना जारी करण्यात आल्याच्या दुसऱ्या दिवशी एकूण 23 जणांनी 35 अर्ज नेल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली. पहिल्या दिवशी एकूण 21 जणांनी 39 अर्ज नेले होते. दुसऱ्या दिवशीही एकही अर्ज दाखल झालेला नाही.

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासाठी अर्ज घेण्यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये आज वरचढा पाहिला मिळाला. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी दोन, तर शिवसेनेचे शहरप्रमुख यांनी देखील दोन, असे स्वतंत्र अर्ज घेतले. हा विषय नगरमध्ये चर्चेचा विषय ठरला. आमदार संग्राम जगताप यांच्यासाठी त्यांचे स्वीय सहायक अशोक शेडाळे हे तीन अर्ज घेऊन गेले.

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी अर्ज नेलेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे; (कंसात अर्जांची संख्या) – श्रीराम जनार्दन येंडे (रा. प्रोफेसर कॉलनी, नगर, अर्ज एक), गौतम काशिनाथ घोडके (रा. सिद्धार्थनगर, श्रीगोंदे, अर्ज 1), एकनाथ बाबुराव गांगुर्डे (रा. वारुळाचा मारुती, नालेगांव, नगर, अर्ज एक), आसाराम दत्तात्रय पालवे (रा. माळीवाडा, नगर अर्ज एक), ज्ञानदेव नरहरी सुपेकर (रा. कुळधरण, ता. कर्जत अर्ज एक), धीरज मोतीलाल बताडे (रा. पाथर्डी, ता. पाथर्डी अर्ज एक), गोरक्ष रावसाहेब चितळे (रा. चितळवाडी, ता. पाथर्डी, अर्ज एक), लक्ष्मण आनंदराव चितळे (रा. माळी चिंचोरा, ता. नेवासा अर्ज एक), नितीन माधवराव थोरात (रा. रासनेनगर, सावेडी, नगर अर्ज एक) यांनी अर्ज नेले.

रामकिसन गोरक्षनाथ ढोकणे (रा. उंब्रे, ता. राहुरी अर्ज दोन), अविनाश इंद्रभान देशमुख यांनी सावंत संजय दगडू यांच्यासाठी एक अर्ज नेला. एकनाथ हरिभाऊ गायकवाड (रा. बागडेमळा, नगर अर्ज दोन), कारभारी रामचंद्र धाडगे (रा. नजीक चिंचोली, ता. नगर, एक अर्ज), शेख फारुख इस्माईल (रा. बोल्हेगांव, नगर तीन अर्ज), प्रा. भानुदास रतन बेरड यांनी डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी दोन अर्ज नेले. अण्णासाहेब रंगनाथ बाचकर (रा. राहुरी दोन अर्ज), मधुकर मोतीराम साळवे (रा. राहुरी खुर्द, राहुरी, एक अर्ज), उमाशंकर श्‍यामबाबू यादव (रा. बोल्हेगांव, नगर, एक अर्ज), अशोक भाऊसाहेब शेडाळे यांनी आमदार संग्राम अरुण जगताप (रा. भवानीनगर, मार्केटयार्डमागे, नगर) यांच्यासाठी तीन अर्ज नेले. जयराम बन्सी औटी (रा. मोकळ ओव्हळ, ता. राहुरी, एक अर्ज), दिलीप नानासाहेब सातपुते यांनी डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी दोन अर्ज घेतले. मोहित विजय यादव यांनी ऍड. सावंत कमल दसरथ यांच्यासाठी तीन अर्ज नेले. संगमनेरचे सुभाष रावसाहेब पोखरकर यांनी दोन अर्ज घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)