भाजप-शिवसेना युतीचा प्रचारही एकत्र

पुणे – आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटत नसताना युतीच्या प्रचाराचा कार्यक्रम ठरला, शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी प्रचाराच्या सुरुवातीलाच युतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे एकत्र मेळावे आयोजित केले आहेत. येत्या १५, १७ आणि १८ मार्च रोजी हे मेळावे महाराष्ट्रात सहा वेगवेगळ्या जिल्ह्यांत होणार आहे. तसेच पदाधिकाऱ्यांच्या या मेळाव्यांनंतर महाराष्ट्रातील युतीचा सर्वात मोठा महामेळावा आयोजित केला जाणार आहे. त्याची घोषणाही येत्या दोन दिवसांत होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

या बैठकीला शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. तर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.

-Ads-

या बैठकीत ठरलेल्या रणनितीप्रमाणे भाजपा व शिवसेना पदाधिकाऱ्यांचा पहिला मेळावा येत्या शुक्रवारी दि १५ मार्च रोजी दुपारी अमरावतीला होणार असून दुसरा पदाधिकारी मेळावा १५ मार्चला रात्री नागपूरला होणार आहे. युतीचा तिसरा मेळावा येत्या रविवारी म्हणजेच १७ मार्चला दुपारी औरंगाबादला होणार असून याच दिवशी युतीचा चौथा मेळावा रात्री नाशिकला होणार आहे. युतीचा पाचवा मेळावा सोमवारी म्हणजेच १८ मार्चला दुपारी नवी मुंबईत होणार असून याच दिवशी युतीचा सहावा मेळावा रात्री पुण्यात होणार असल्याचे या बैठकीत ठरले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)