बारामतीत ‘भाजप-रासपची’ महत्वाची बैठक सुरू

पुणे (बारामती) – बारामतीतील लोकसभा निवडणुकीचा उमेदवार ठरविण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर चर्चेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये आगामी लोकसभेचा उमेदवार ठरविण्यासाठी गिरीष बापट, रासपचे आमदार राहुल कुल यांच्यासह भाजप आणि रासप पक्षाचे मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणूकीची रणनिती ठरविण्यासाठी महत्वाची बैठक बारामती येथे सुरू आहे.

दरम्यान, बारामती मतदार संघातून सध्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत, आणि बारामती हा शरद पवार यांचा बोलकिल्ला समजला जातो. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपण बारामती किंवा माढा लोकसभा मतदारसंघातुन राष्ट्रवादीच्या विरोधात स्वत:च्या पक्षाच्या चिन्हावर निवडणुक लढवणार असल्याची घोषणा काही दिवसापूर्वी केली होती. लोकसभेसाठी रासपला 6 जागा द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी भाजपकडे केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दौंडमध्ये ‘एकच नाणे’ चालविणे कठीण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)