भाजपकडून पक्षाच्या खासदारांना व्हिप जारी

नवी दिल्ली – भाजपने मंगळवारी पक्षाच्या खासदारांसाठी व्हिप जारी केला आहे. बुधवारी संसदेत उपस्थित राहण्याबाबत व्हिपमध्ये निर्देश देण्यात आले आहेत. या व्हिपनुसार पक्षाच्या सर्व खासदारांना बुधवारी संसदेत उपस्थित राहावे लागणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमन बुधवारी अर्थसंकल्पावर चर्चा करणार असून प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा व्हिप जारी करण्यात आल्याची चर्चा आहे. पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात आलेल्या 2 रुपये प्रतीलिटरच्या अतिरिक्त कराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजपवर टीका करण्याची शक्‍यता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here