भाजपाकडून लोकसभेसाठी तिसरी यादी जाहीर

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर केली आहे. यामध्ये तेलंगानातून 5, केरळमधून 1, उत्तर प्रदेश 3 आणि पश्चिम बंगाल 1 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

भाजपाने उत्तर प्रदेशातील कैरानातून प्रदीप चौधरी यांना तिकीट दिले आहे, तर बुलंदशहर येथून भोला सिंह यांना रिंगणात उतरवले आहे. नगीना येथून डाॅक्टर यशवंत यांना तिकिट दिले आहे. याशिवाय तेलंगानातील चेवेल्ला येथून जर्नादन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

याआधी शुक्रवारी रात्री भाजपाने दुसऱ्या यादीत 36 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. यामध्ये आध्रंप्रदेशातील 23 उमेदवारांच्या नावाचा समावेश होता, याठिकाणी 11 एप्रिलला पहिल्या टप्यात मतदान होणार आहे. तसेच या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील सहा आणि ओडिशातील पाच उमेदवारांच्या नावाचा समावेश होता. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा हे ओडिशातील पुरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय भाजपने गुरूवारी पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये 184 उमेदवारांच्या नावाचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)