लोकसभा2019 : भाजपची बारावी यादी जाहीर; 3 विद्यमान खासदारांचा पत्ता कट

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. भाजप उमेदवारांची ही 12 वी यादी आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने जाहीर केलेल्या यादीत जम्मू काश्मीर (1), कर्नाटक(3), मध्यप्रदेश(3), महाराष्ट्र(1) आणि राजस्थानातील 3 उमेदवारांचा समावेश आहे.

आजच्या यादीत मध्यप्रदेश-राजस्थान येथील 3 विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यत आला आहे. यामध्ये मध्यप्रदेशच्या बालाघाटमधून बोध सिंह भगत, खरगोन येथून सुभाष पटेल आणि राजस्थानच्या बांसवाडामधून मानशंकर निनामा यांच तिकिट यावेळी कापण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील माढा येथून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकिट देण्यात आले आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोमवारीच काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता.

जम्मू काश्मीरमधील लद्दाख येथून जमयांग सेरिंग नमगयाल यांना उमेदवारी दिली आहे. राजस्थानमध्ये चुरू, अलवर आणि बांसवाडा येथील मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)