मुरलीमनोहर जोशींनाही भाजपने नाकारली उमेदवारी

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी यांनाही पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. तुम्ही निवडणूक लढवू नका अशी पक्षाने आपल्याला सुचना केली आहे असे त्यांनी म्हटले आहे. सन 2014 सालची निवडणूक त्यांनी कानपुर मधून लढवली होती व ती निवडणूक त्यांनी जिंकलीही होती.

भाजपचे संघटन सचिव रामलाल यांनी जोशी यांना पक्षाच्या नेतृत्वाचा हा निर्णय कळवला. वयाची पंचाहत्तरी पार केलेल्यांना उमेदवारी द्यायची नाही असे पक्षाचे धोरण असल्याचे त्यांना सांगण्यात आले. मुरलीमनोहर जोशी हे 85 वर्षांचे आहेत. तथापी या आधी पक्षातल्या ज्येष्ठांना त्यांच्या निवडणुकीबाबत त्यांनीच निर्णय घ्यावा असे सांगण्यात आले होते. पण नंतर पक्षानेच त्यांना निवडणूक लढवू नका अशी सुचना केली आहे. दरम्यान भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीतूनही या ज्येष्ठांना वगळण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)