भाजपच्या आघाडीतून मिझो फ्रंट बाहेर 

ऐझॉल – भाजपने ईशान्य भारतासाठी तयार केलेल्या राजकीय आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय मिझो नॅशनल फ्रंट या पक्षाने घेतला आहे. या आघाडीतील हा एक महत्वाचा पक्ष होता. मिझोरामच्या विधानसभेसाठी येत्या 28 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी घेतलेल्या निर्णयाला महत्व आहे. आम्ही भाजपशी निवडणूक आघाडी करणार नाही असे त्या पक्षाचे अध्यक्ष झोरामथंगा यांनी म्हटले आहे.

तथापी मिझोरामच्या निवडणूकीत त्रिशंकु स्थिती निर्माण झाली तर त्यावेळी हा फ्रंट आमच्या बरोबर आघाडी करेल असे विश्‍वास भाजपचे त्रिपुरातील नेते प्रतिमा भौमिक यांनी म्हटले आहे. या निवडणुकीत या पक्षाने आमच्या बरोबर आघाडी करण्यास मनाई केली आहे हे वृत्त खरे आहे असे त्यांनी मान्य केले. मिझो नॅशनल फ्रंट या पक्षाचे अध्यक्ष झोरमथंगा यांनी सांगितले की आमची आणि भाजपची निवडणूक आघाडी झाली आहे असे खोडसाळ वृत्त पसरवले जात आहे पण आम्ही भाजपबरोबर कोणतीही युती करणार नाही आणि आम्ही स्वबळावर ही निवडणूक लढणार आहोत अन्य पक्षांशीही आम्ही युती करणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. आमची त्या पक्षाच्या नेत्यांबरोबर कोणतीही चर्चा झालेली नाही त्यामुळे निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येऊ या भाजप नेत्यांच्या दाव्यातही तथ्य नाही असे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)