भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये – शिवसेना  

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसने अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा कॉंग्रेसला सोडण्यास नकार दिल्याने नाराज झालेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद वाढले आहे. एकीकडे काँग्रेसचे जेष्ठ नेते आक्रमक झाले तर दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  मित्रपक्ष भाजपला सामनातील अग्रलेखातून सल्ला दिला आहे.

सामनातील अग्रलेखात असे प्रतिपादन करण्यात आले आहे की,  ”भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये या मताचे आम्ही आहोत. महाराष्ट्रातील घराणी ही काँग्रेसची होती. त्या घराण्यांच्या विरोधात आपला संघर्ष होता. ही घराणी म्हणजे विचारांचे ब्रह्मवाक्य नव्हे. वारा येईल तशी पाठ फिरवणारी ही घराणी. उद्या शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल तेव्हा भूकंपाचा रिमोट शिवसेनेकडे असेल व ही घराणी शिवसेना भवनाच्या रांगेत असतील. त्यामुळे आपली माणसे आणि मूळ विचारच खरा. तरीही तरुण तडफदार सुजय विखे-पाटील यांच्या नव्या कारकीर्दीस आम्ही शुभेच्छा देत आहोत. तुम्ही आलात, आनंद आहे.’

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)