स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी भाजपकडून सुनिल कांबळे यांना उमेदवारी

पुणे: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आणि पालिकेतील समीकरणे लक्षात घेऊन स्थायी समिती अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. स्थायी समिती मध्ये सर्वाधिक भाजप सदस्य असल्याने सुनील कांबळे अध्यक्ष होणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्मिता कोंढरे यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.

महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी दि. 5 मार्चला निवडणूक होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत गुरूवारी दुपारी 3 ते 5 अशी आहे. पालिकेत भाजपचे बहुमत आहे. त्यामुळे भाजपकडून ज्या सदस्याला उमेदवारी मिळणार, तोच अध्यक्षपदी विराजमान होणार हे निश्‍चित आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)