केरळातील हिंसाचारा विरोधात भाजप खासदारांचे धरणे

नवी दिल्ली: केरळात भाजप व हिंदुत्ववादी नेत्यांच्या विरोधात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात जोरदार निदर्शने केली. केरळात नुकतेच भाजपचे राज्यसभा सदस्य व्ही मुरलीधरन यांच्या घरावर गावठी बॉम्ब फेकण्याचा प्रकार घडला होता.

असे प्रकार मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारच्याच आदेशाने होत आहेत असा भाजपचा आरोप आहे. त्याच्या निषेधार्थ भाजप खासदारांनी संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्याजवळ निदर्शने केली. त्यात भुपेंद्र यादव, शोभा करंदलजे या भाजप खासदारांनी मार्क्‍सवाद्यांच्या विरोधात घोषणा लिहीलेले फलक फडकावले. केरळात सध्या हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि मार्क्‍सवादी कार्यकर्त्यांमध्ये शबरीमला प्रकरणावरून जोरदार वादंग सुरू आहे. भाजप सदस्यांनी या विषयी संसद सभागृहातही आवाज उठवला होता.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)