पांढरे केस रंगवून मायावती स्वत:ला तरुण दाखवतात ; भाजप आमदाराची जीभ घसरली

लखनौ: भाजप आमदार सुरेंद्र नारायण सिंग यांची मायावतींवर टीका करतं जीभ घसरली आहे. ‘मायावती या 60 वर्षांच्या झाल्या आहेत पण दररोज फेशियल करून, केस काळे करून त्या तरुण राहायचा प्रयत्न करतात’, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.

नरेंद्र मोदी अगदी शाही अंदाजात राहत आहे. आता ते या निवडणूकीत मोठा गाजावाजा करत स्वत:ला चौकिदार घोषित करत आहेत. खरंच देश बदलतोय का? अशी टीका मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राहणीमानावर केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या टीकेला उत्तर देतांना सुरेंद्र नारायण सिंग म्हणाले,  ‘मायावतीजी स्वत: रोज फेशियल करतात त्या आमच्या नेत्याला शौकीन कसं म्हणू शकतात. केस त्यांचे पांढरे झालेत पण ते रंगवून आज पण मायावती स्वत:ला तरुण दाखवतात. 60 वर्षाच्या झाल्या आहेत पण त्यांचे सर्व केस काळे आहेत’,

 

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)