भाजप आमदाराने तोडले मुलाबरोबरचे संबंध

कॉंग्रेसने तिकीट दिल्यावर उचलले पाऊल

नोएडा -उत्तरप्रदेशातील भाजपचे आमदार जयवीर सिंह यांचे पुत्र अरविंदकुमार यांना कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. प्रतिस्पर्धी पक्षाचे तिकीट मुलाने स्वीकारल्यामुळे नाराज झालेल्या सिंह यांनी थेट मुलाबरोबरचे संबंध तोडत असल्याचे जाहीर केले.

कॉंग्रेसने शनिवारी अरविंदकुमार यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांना उत्तरप्रदेशच्या गौतम बुद्ध नगर मतदारसंघातून रिंगणात उतरवण्यात आले. त्या घडामोडीमुळे भाजपचे नेते असणाऱ्या जयवीर सिंह यांच्या कुटूंबात वादळ निर्माण झाले. सिंह यांनी तातडीने प्रतिक्रिया देत मुलाबरोबरचे संबंध तोडत असल्याचे स्पष्ट केले.

अरविंदकुमारचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले. तेव्हापासूनच त्याने वेगळ्या विचारसरणीचा अनुनय करण्यास प्रारंभ केला. तो आमच्या कुटूंबापासून वेगळे राहत होता, असेही सिंह यांनी नमूद केले. लोकसभेत सध्या गौतम बुद्ध नगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते महेश शर्मा करत आहेत. त्यामुळे भाजपच्या दृष्टीने त्या मतदारसंघाला महत्व आहे. त्यामुळे मुलाने कॉंग्रेसची उमेदवारी स्वीकारणे भाजप नेते जयवीर सिंह यांना रूचलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)