भाजप म्हणजेच ‘गॅंग ऑफ वासेपूर’! : राधाकृष्ण विखे-पाटील

विखे-पाटीलांचा सरकारवर चौफेर हल्ला : 4 वर्षे केवळ ठगबाजीच 

मुंबई: भाजपमध्ये गुंडांना कसा राजाश्रय मिळतो, हे भाजपचेच आमदार जाहीरपणे सांगत आहे. त्यामुळे विरोधी पक्षाला “गॅंग ऑफ वासेपूर’ची उपमा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांची भाजप हीच महाराष्ट्रातील खरी “गॅंग ऑफ वासेपूर’ आहे, असा जोरदार हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. यावेळी विखे-पाटील यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. ते म्हणाले की, विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांनी सरकारला “ठग ऑफ महाराष्ट्र’ची उपमा दिली होती. ही उपमा या सरकारने मागील 4 वर्ष सार्थ ठरवली आहे. औद्योगिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांसाठीच्या अनेक योजना, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन, सामाजिक न्यायाच्या योजना अशा प्रत्येक आघाडीवर या सरकारने केवळ ठगबाजीच केली. त्यामुळे लोकांना सोप्या शब्दांत कळेल, अशा भाषेत आम्ही सरकारला “ठग ऑफ महाराष्ट्र’ची उपमा दिल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.

शिवसेना पक्षनेते उद्धव ठाकरे यांच्या अयोध्याचा दौऱ्याचाही त्यांनी समाचार घेतला. अयोध्या दौरा एक “इव्हेंट’ असल्याचा ठपका ठेवत दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपला “निर्लज्ज’ संबोधले होते, याकडे लक्ष वेधले. भाजपला शक्‍य नसेल तर मी अयोध्येत जाऊन मंदिर बांधतो, अशी वल्गना करून उद्धव ठाकरे अयोध्येला गेले. लोकांना वाटले, आता ते मंदिर बांधूनच परतणार! पण उद्धव ठाकरे केवळ शरयूच्या तिरावर आरती करुन आणि सभास्थानाचे भूमिपूजन करून मुंबईत परतले. आरती झाल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी आपल्या खिशातील राजीनाम्याच्या होड्या शरयू नदीत सोडल्या, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)