भाजपच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी ‘या’ तारखेला होणार जाहीर

मुंबई – राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लोकसभेच्या जागा घोषित केल्या आहेत. त्यानंतर भाजपही आपल्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी 16 मार्चला जाहीर करणार आहे. भाजपचे राज्यात एकूण 25 उमेदवार लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

राज्यात लोकसभा निवडणूकीसाठी भाजप-शिवसेना यांची युती झाली असून 25-23 चा फार्म्युला ठरलेला आहे. भाजपच्या 25 उमेदवारापैकी 17 ते 18 नावं पहिल्या यादीत जाहीर होणार असून उर्वरित जागांबाबत अजूनही निर्णय झाला नसल्याची माहिती समोर येत आहे.  दरम्यान, आज लोकसभा 2019 निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)