हात कापण्याची धमकी भाजप नेत्याला पडली महागात; आयोगाने मागितला खुलासा

मंडी (हिमाचल प्रदेश): लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले असून चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी संपूर्ण नेते तयारीला लागले आहेत. मात्र राजकीय नेत्यांचे वादग्रस्त विधानाचे सत्र सुरूच आहे. हिमाचल प्रदेशचे भाजप अध्यक्ष सतपाल सिंह सत्ती यांनी बुधवारी एक वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवली आहे. तसेच त्यांना २४ तासांच्या आत खुलासा मागितला आहे.

बुधवारी मंडी येथील प्रचार सभेत संबोधित करताना भाजप अध्यक्ष सतपाल सिंह सत्ती म्हणाले, ‘मोदीजींवर कोणी बोट उचलेल तर आम्ही त्याचा हात कापून दुसऱ्या हातात देऊ’ यावेळेस त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या सुद्धा हल्लाबोल केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, आयोगाने सतपाल सिंह सत्ती यांच्यावर निवडणूक प्रचार करण्यापासून ४८ तास बंदी घातली होती. ४८ तासांची बंदी संपल्यानंतर या नेत्यानी आणखी एक वादग्रस्त विधान केल्याचे वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)