#पाटणा_साहिब_लोकसभा2019 : रविशंकर प्रसाद यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नवी दिल्ली – बिहारमधील पटणा साहिब लोकसभा मतदारसंघातून रविशंकर प्रसाद यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पाटणा साहिब या लोकसभा मतदारसंघात विद्यमान कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांना काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा यांचे आव्हान असणार आहे.

रविशंकर प्रसाद यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भव्य रोड शो करत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी बाबा रामदेव देखील उपस्थित होते. ‘यंदा मोदी लाट नाहीतर त्सुनामी आहे’,असं बाबा रामदेव यावेळी म्हणाले.

मागील लोकसभा 2014 च्या निवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा हे भाजपाच्या तिकिटावर पटना साहिब येथूनच विजयी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केल्यानं सिन्हा यांच्यावर भाजप नेतृत्व नाराज होतं. त्यामुळे त्यांना पाटनामधून तिकीट नाकारलं गेलं होतं. त्यानंतर भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी 6 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना काँग्रेसकडून बिहारच्या पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पाटणामध्ये शत्रुघ्न सिंन्हा विरूद्ध रवि शंकर प्रसाद या लढतीकडे सगळ्याचेच लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)