गुजरातेतील भाजप नेत्याची हत्या

अहमदाबाद: गुजरात मधील भाजप नेते आणि माजी आमदार जयंती भानुशाली यांची एका चालत्या रेल्वेगाडीतच हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. भुज-दादर एक्‍स्प्रेस मध्ये आज मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली. भानुशाली भूजहून अहमदाबादला परतत होते. ते गुजरात प्रदेश भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष होते. त्यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने त्यांना हे पद सोडावे लागले होते. तथापी नंतर सदर महिलेने ही तक्रार मागे घेतली आणि कोर्टानेहीं त्यांच्या विरोधातला खटला रद्द केला होता.

गांधीधाम ते सुरजबारी स्थानकांच्या दरम्यान काही अज्ञात इसमांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांचा मृतदेह मोरबी स्थानकावर उतरवून घेण्यात आला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यांच्या शरीरात दोन गोळ्या घुसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या हत्येचे कारण समजू शकलेले नाही. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)