सोलापूर – लोकसभा मतदारसंघातून यावेळी भाजपतर्फे जय सिद्धेश्वर स्वामी, काँग्रेसतर्फे सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांना उमेदवारी देण्यात आली होती.
सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजपचे जय सिद्धेश्वर स्वामी हे 38450 मतांसह आघाडीवर असून त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे 33121 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्या स्थानावर असून त्यांना आत्तापर्यंत 13211 मतं मिळाली आहेत.