भाजपा आमदार आशिष देशमुखांचा काँग्रेसमध्ये प्रवेश 

नवी दिल्ली: भाजपचे विदर्भातील काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी आज पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. राजस्थानचे भाजपा आमदार तथा भाजपाचे जेष्ठ नेते जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांनी देखील आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
तत्पूर्वी खासदार नाना पटोले यांच्या पावलावर पाउल ठेवत काटोल मतदारसंघातील नाराज भाजपा आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी भाजपाला रामराम ठोकला होता. आशिष देशमुख यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द करत कॉंग्रेस प्रवेशाबाबत स्पष्ट संकेत दिले होते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)