दुष्काळाच्या निमित्ताने भाजपची राजकीय तयारी सुरू

संदीप राक्षे

रिमोट पुन्हा चंद्रकांत दादांच्या हातीमाण खटाव दुष्काळ निवारणासाठी 300 टाक्‍या व 5 ट्रकचा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा दौरा लवकरच

300 पाण्याच्या टाक्‍या व पाच ट्रक चारा

राष्ट्रवादीने टॅंकर वाटपाचा जो इव्हेंट बारामती ऍग्रोकडून केला तसाच जामानिमा करण्याच्या तयारीत भाजप आहे. माण व खटाव तालुक्‍यात सुमारे 765 फेऱ्या टॅंकरच्या झाल्या असून त्यावर जिल्हा प्रशासनाचे आठ कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्या पाण्याच्या साठवणूकीसाठी भाजप जिल्हा कार्यकारिणी तीनशे पाणी टाक्‍या व पाच ट्रकचारा माण व खटाव तालुक्‍यात पाठवण्याची तयारी केली आहे. त्या अनुषंगाने कराडात पाणी वाचवा असा संदेश देणारी मोठी रॅली निघणार असून त्यातही भाजपकडून जो संदेश दिला जायचा तो जाणारचं आहे. कराडचा बेस पकडून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुष्काळी भागाचे दौरे गतिमान केले असून शक्‍य तिथे राजकीय बेरजाही सुरू केल्या आहेत. भाजपने एक बूथ पच्चीस यूथ असणारे 1900 बूथ पूर्ण केले असून सध्या तरी राष्ट्रवादीला पक्की ट्‌शन देण्यासाठी भाजप कोणतीही कसूर ठेवणार नाही.

सातारा – चार महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सत्तारूढ भाजपने राजकीय पेरणी सुरूच ठेवत आता न थांबण्याचा इशारा दिला आहे. पुन्हा एकदा पश्‍चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचा रिमोट हातात ठेवत कोयना काठावरून दादांनी विधानसभेचा पेपरच्या तयारी ठेवली आहे. केंद्रात व राज्यात किती जागांवर विजय मिळवायचा याचे लक्ष्य कोल्हापूर येथे झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज्य मंत्रिमंडळात द्वितीय स्थानी असलेले महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले होते आणि गेल्या दोन वर्षात पाटलांनी साताऱ्यात राष्ट्रवादीला टक्कर देण्याचे नियोजन पक्के ठेवले आहे. माण खटाव विधानसभा मतदारसंघात दुष्काळाच्या झळा तीव्र आहेत.

शासनाच्या प्रत्येक योजनेचे व अनुदान सत्रांचे राजकीय मार्केटिंग करायला माणमध्ये अनिल देसाई डॉ. दिलीपराव येळगावकर सारखी मंडळी अगदी सज्ज आहेत. माणच्या तीव्र दुष्काळाची पाहणी करून सोलापूरला गेलेल्या चंद्रकांत थोरल्या पवारांच्या संदर्भात पंटर हा केलेला उल्लेख राष्ट्रवादीला भलताच झोंबला. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने कोल्हापुरात दादांना जाब विचारण्याचा प्रयत्न करत राजकीय हवा तापवण्याचा प्रयत्न केला. पंटर आणि पवारांनी चंद्रकांतदादांना उद्देशून बारका माणूस या शाब्दिक उल्लेख केला होता या खेचाखेचीत दुष्काळातही राजकीय साधन शुचितेचा दुष्काळ दिसून आला. थोरल्या पवारांनी जाणता राजा या उपाधीला अनुसरून थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली वाढीव दुष्काळी अनुदानावर सुद्धा राष्ट्रवादी व भाजपामध्ये राजकीय तू तू मै मै झाली मात्र दुष्काळावर राजकारण करायचे नाही या संकेतावर दोन्ही बाजू ठाम राहिल्या.

मुख्यमंत्र्यांच्याही दौऱ्याची शक्‍यता ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने सातारा जिल्हातील दुष्कळी तालुक्‍यांच्या दौऱ्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. चारा छावण्याची कमी संख्या व पाण्याची टंचाई या गोष्टी निदर्शनास आणून देणार असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सांगितले. वाढून आलेल्या चारा छावणीच्या अनुषंगाने दादांनी कोल्हापूरात जे काम केले तेच काम त्यांना साताऱ्यात करावे लागणार आहे 170 आमदारांची घोषणा दादांनी कोल्हापूरच्या पक्षीय मेळाव्यात केली होती. मात्र लोकसभा निवडणुकांचे निकाल आगामी समीकरणांना दिशादर्शन असणारे आहेत. सातारा व माढा या दोन लोकसभा मतदार संघात पक्‍की मांड ठोकायची हे भाजपचे सुप्त मनसुबे आहेत. आता साताऱ्यात राष्ट्रवादीला पेपर अवघड असला तरी भाजपलाही राजकीय लढत फारच अवघड आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात सक्षम उमेदवार दीपक पवार वगळता मिळत नसल्याने दादांचा चेहरा अचानक काहीसा त्रासिक होत आहे. मात्र कराड माण खंडाळा व सातारा या चार तालुक्‍यात भाजपचे चांगलेच बस्तान बसले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला घेरण्याच्या तयारीने भाजपच्या तंबूत खलबते सुरू आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)