मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या कार्यालयासाठी जमीन खरेदी प्रकरणावरून भाजपवर टीका केली आहे. आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर एक व्हिडीओ अपलोड करून भारतीय जनता पक्ष आता भारतीय जमीन पक्ष झाल्याचं राष्ट्रवादीने म्हटले आहे.
“भाजपाने देशभरात पक्षाची ऐसपैस कार्यालये उभारण्यासाठी जमिनी खरेदी करण्याचा सपाटा लावला. देशात सहाशे ठिकाणी भाजपा कार्यालये उभारण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय. यासाठी मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी सुरू आहे. देशभरात असे जवळपास दोन हजार कोटी रुपये किंमतीच्या जमिनीचे व्यवहार करण्यात आले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आता भारतीय जमीन पक्ष झाल्याचं”, राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.