कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपला दणका 

कॉंग्रेस आघाडीने जिंकल्या पाच पैकी चार महत्वाच्या जागा 

बंगळुरू – कर्नाटकात लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज झाली. त्यात भारतीय जनता पक्षाला मोठा दणका बसला आहे. या एकूण पाच निवडणुकांपैकी चार निवडणूकांत कॉंग्रेस आणि जेडीएस आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत.

सन 2004 पासून भाजपच्या ताब्यात असलेल्या बल्लारी लोकसभा मतदार संघात कॉंग्रेसने एकतर्फी विजय मिळवून भाजपला चकीत केले आहे. या निकालाची सर्वाधिक चर्चा होत आहे. कर्नाटकात आज झालेल्या निकालात कॉंग्रेस-जेडीएस आघाडीने लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या दोन जागा जिंकल्या. केवळ शिवमोगा लोकसभेची जागा आपल्याकडे राखण्यात भाजपला यश आले. हा भाजप नेते बीएस येडियुरप्पा यांच्या प्रभावाखालील मतदार संघ आहे. तेथे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे बी वाय राघवेंद्र विजयी झाले.त्यांनी जेडीएसचे सिद्धरामैय्या यांचा 52 हजार मतांनी पराभव केला.

बल्लारी लोकसभा मतदार संघात कॉंग्रेसचा तर मंड्या लोकसभा मतदार संघात जेडीएस पक्षाचा विजय झाला. जमखंडी आणि रामनगर या दोन विधानसभा मतदार संघातही कॉंग्रेस-जेडीएस युतीने विजय मिळवला आहे. बल्लारी लोकसभा मतदार संघात कॉंग्रेसचे उमेदवार व्ही. एस. उग्राप्पा यांनी भाजपच्या जे शांता यांचा तब्बल 2 लाख 43 हजार मतांनी पराभव केला. जे शांता या भाजपचे प्रभावशाली नेते बी श्रीमालू यांच्या भगिनी आहेत. या मतदार संघावर वादग्रस्त रेड्डी बंधुंचाही प्रभाव आहे. पण तरीही भाजपला येथे पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मंड्या लोकसभा मतदार संघात जेडीएस म्हणजेच धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवार एल. आर शिवरामेगोैडा यांनी भाजपचे उमेदवार सिद्धरामैय्या यांचा 3 लाख 24 हजार मतांनी पराभव केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)