भाजपला आसामात धक्का! तेजपुरच्या खासदाराने सोडला पक्ष

गुवाहाटी – भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याच्या आधीच पक्षाला हादरे जाणवू लागले असून काल प्रयागराजच्या नेत्याने पक्ष सोडल्याची घोषणा केली त्या पाठोपाठ आज भाजपचे आसामातल्या तेजपुरचे विद्यमान खासदार रामप्रसाद समराह यांनी पक्ष सोडल्याची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की सध्या पक्षात घुसखोरांची चलती असून त्यांच्यामुळे पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याने आपण भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा फेसबुकवरून केली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे की मला पक्षातल्या जुन्या कार्यकर्त्यांविषयी अत्यंत दुख: वाटते आहे. सध्या भाजप मध्ये घुसखोरांचीच चलती सुरू आहे. भाजपने तेजपुर मधून पक्षाच्या ज्या उमेदवारांची संभाव्य यादी पक्षश्रेष्ठींकडे मंजुरीसाठी पाठवली आहे त्यात रामप्रसाद यांचे नाव नाही त्यामुळे ते नाराज झाले होते. आपले नाव वगळले गेल्याचे समजल्याने आपल्याला फार यातना झाल्या असेही त्यांनी म्हटले आहे. पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी आसामात भाजप रूजवण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले पण त्यानांच आता पक्षात अवमानकारक वागणूक दिली जात आहे. अशा कार्यकर्त्यांना आवाज देण्याचा प्रयत्न आपण करीत राहु असेही त्यांनी म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)