भाजपने मला कानपूरसह कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू नये असे सांगितले आहे – मुरली मनोहर जोशी

कानपुर – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी आगामी लोकसभा निवणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुरली मनोहर जोशी यांनी एका निनावी पत्राद्वारे पक्षानेच आपल्याला निवडणूक लढवू नये, असे म्हंटल्याचे या पत्रात लिहिले आहे.

कानपुर मधील मतदारांना लिहिलेल्या या पत्रात, “माझ्या प्रिय मतदारांनो, भाजपच्या संघटन महामंत्री रामलाल यांनी मला कानपूरसह कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू नये असे सांगितले आहे.” असा आशय लिहिलेला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात सुद्धा भाजपचे संस्थापक लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. स्टार प्रचारकाच्या यादीत  लालकृष्ण आडवाणी यांचे नाव नसल्याने आडवाणी युगचा अंत होताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यापासून लालकृष्ण आडवाणी सर्वात मोठे स्टार प्रचारक होते. परंतु, यंदाच्या निवडणुकीत लालकृष्ण आडवाणी याना उमेदवारी देण्यात आली नाहीच. परंतु, त्यांचे नाव स्टार प्रचारक यादीतूनही वगळण्यात आले. त्यामुळे मुरली मनोहर जोशी यांच्या सोबत देखील तेच घडणार का ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उमटत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)