भाजप सरकारने चार महिने 10,000 चौकीदारांना वेतनचं दिले नाही !

झारखंड: पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी सोशल मीडियावर स्वतःला ‘मै भी चौकीदार’ म्हणून घेण्याची जोरदार मोहीम बजावली. मात्र वास्तविक काही चौकीदारांनी रांचीमध्ये निषेध व्यक्त केला आहे. गेली चार महिने भाजप सरकारने त्यांना वेतनचं दिले नाही. त्यामुळे स्वतःला चौकीदार म्हणून घेण्याच्या गडबडीत भाजप सरकार खऱ्या चौकीदारांना विसरले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नरेंद्र मोदी आणि इतर सदस्यांनी ‘मै भी चौकीदार’ अभियान राबवत ‘चौकीदार’ म्हणून स्वत:चा उल्लेख करुन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तर झारखंडमध्ये भाजपचे सरकार असून राज्यातील 10,000 चौकीदारांना गेल्या चार महिन्यांचे वेतन दिले गेले नाही.

द टेलीग्राफ मधील विजय देओ झा यांनी केलेल्या एका अहवालाच्या मते मंगळवारी 19 मार्च रोजी रांची येथील पोलिस स्टेशन मध्ये चौकीदारांनी येथे एक तासभर शांत निषेध व्यक्त केला. अहवालानुसार, 24 जिल्ह्यांत प्रत्येक चौकीदार 10 गावांचे निरीक्षण करतात. त्यांना प्रत्येकी 20,000 रु महिना आहे. त्यांचे वेतन गेल्या चार महिन्यांपासून दिले नसल्याचे अहवालात म्हटले आहे.

दरम्यान. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. ‘मैं भी चौकीदार’ म्हणवून घेण्याची स्पर्धा मोदीभक्तांमध्ये लागली असताना झारखंडमधील भाजप सरकारने गेले चार महिने पोलिस दलातील 10 हजार चौकीदार पदावरील कर्मचार्‍यांचे पगारच दिलेले नाहीत, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)