भाजपने देशाला 3 मोदी दिले : सिद्धू

कोटा, (राजस्थान): भाजपने देशाला तीन मोदी दिले. नीरव मोदी, ललित मोदी आणि तिसरे मोदी अंबानींच्या मांडीवर बसलेले नरेंद्र मोदी आहेत अशा शब्दामध्ये कॉंग्रेसचे नेते आणि पंजाबमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. पाकिस्तानमध्ये करतारपूर कोरिडोरच्या भूमिपूजनप्रसंगी उपस्थित राहिलेल्या सिद्धू यांच्यावर सातत्याने टीकेची झोड उठवण्यात येत आहे. त्यातच राजस्थान विधानसभेसाठीच्या निवडणूकीदरम्यान कॉंग्रेसच्या प्रचार सभेमध्ये बोलताना सिद्धू यांनी हे वक्‍तव्य केले आहे.

दोनच दिवसांपूर्वी राफेल प्रकरणावरून पंतप्रधान मोदींवर टीका करताना सिद्धू यांनी “चौकीदाराचा श्‍वान चोरांना सामील आहे.’असे प्रक्षोभक वक्‍तव्य केले होते. त्यावरून त्यांच्यावर तीव्र टीका झाली होती. आज बोलताना कॉंग्रेसने इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी देशाला चार गांधी दिले, तर भाजपने तीन मोदी दिले आहेत. नीरव आणि ललित मोदींबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख “अंबानींच्या मांडीवर बसलेले’ असा केल्यामुळे सिद्धू यांच्यावर पुन्हा टीका व्हायला लागली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
3 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)