पुण्यातील भाजप उमेदवाराचा ‘सस्पेन्स’ संपला; बापट यांना उमेदवारी जाहीर

पुणे – अखेर पुण्यातील भाजप उमेदवाराचा सस्पेन्स संपला असून भाजपकडून विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना डच्चू देत, उमेदवारीची माळ पालकमंत्री गिरीश बापाट यांच्या गळयात टाकली आहे. तर बारामती लोकसभा मतदार संघातून रासपचे आमदार राहुल कुल याच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता कुल या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढणार आहेत.

पुण्यात बापट यांच्यासह विद्यमान खासदार अनिल शिरोळे आणि भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे इच्छुक होते. तर काकडेंनी बंडखोरीचा झेंडा हातात घेत काँग्रेस मध्ये जाण्याची घोषणाही केली होती. मात्र थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच काकडे याचे बंड मोडीत काढले तर पक्षाने शिरोळे यांचे टिकीट कापल्याने बापट यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान रात्री उशीरा भाजपने आपली दुसरी यादी जाहीर केली असून त्यात ही नावे आहेत. तर, सोलापूरचे विद्यमान खासदार अॅड. शरद बनसोडे यांचाही पत्ता कट झाला असून डॉ. जय सिद्धेश्वर स्वामी ( महाराज) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)