पालिका अधिकाऱ्यांना मारहाण भाजपा नगरसेवकाला भोवणार 

अवमान कारवाईची न्यायालयाची नोटीस 

मुंबई – बेकायदा होर्डींग विरोधात कारवाई करण्यास आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना उच्च न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. न्या. अभय ओक आणि न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाने नगरसेवक मुरजी पटेल यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावली असून 12 मार्च पर्यंत भुमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यभरातील बेकायदेशीर होर्डींगविरोधात सुस्वराज्य फाऊंडेशनतर्फे मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरच्या सुनावणीच्यावेळी न्यायालयाने पालिका अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या भाजपा नगरसेवक मुरजी पटेल यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगलेच फैलावर घेतले. घडलेल्या प्रकरणाची जबाबदारी घेत माफी मागा आणि पालिका अधिकाऱ्यांना केलेल्या मारहाणीबद्दल पालिकेकडे नुकसानभरपाई देऊन हे प्रकरण मिटवा, असे निर्देश न्यायालयाने दिले.

त्यानंतर मुरजी पटेल यांनी नुकसानभरपाई देऊन प्रकरण मिटविण्याची तयारी दर्शविली. मात्र बेकायदेशीर होर्डिंग
लावल्याचे कबूल करण्याबाबत मात्र मौन बाळगले. न्यायालयाने या बाबत जाब विचारताच पटेल यांनी आपल्या विरोधात
या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असल्याची कबुली दिली तर आपली राजकीय कारर्किर्द संपूष्टात
येईल, अशी भीती व्यक्‍त केली. तसेच हायकोर्टात अशा प्रकारे थेट सुनावणी होऊ शकत नाही, अशी भुमिका घेतली. यावर न्यायालयाने तीव्र नराजी व्यक्त केली. पालिकेच्या कारवाईत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तुमच्यावर अवमानाची कारवाई का करु नये? असा सवाल करून न्यायालयाने नगरसेवकासह कार्यकर्त्यांवर न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)