पवारांचा निवडणूक लढवण्याचा बार फुसका – भाजप

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधी माढा लोकसभा निवडणूक लढवणार अस जाहीर केलं होतं मात्र त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले. पराभूत होण्याच्या भीतीने पवार माढ्यातून निवडणूक लढविणार नाहीत, अशी चर्चा सोशल मीडियामध्ये रंगली होती. त्यानंतर भाजपाने देखील सोशल मिडीयाव्दारे शदर पवार यांच्या लोकसभा निवडणूकीच्या लढण्याच्या निर्णयावर टीका केली असून पवारांचा निवडणूक लढण्याचा बार फुसका असं म्हटलं आहे.

भाजपाने आपल्या ट्विटर अकाउंटवर याबाबत ट्विट केले आहे. ट्विटमध्ये म्हटलं आहे की,

“नरेंद्र-देवेंद्र जोडीचा धसका
पवारांचा निवडणूक लढवण्याचा बार फुसका

आघाडीचा सूर्य ‘मावळ’णार
कारण जनताच म्हणणार #फिर_एक_बार_मोदी_सरकार”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माढा लोकसभा निवडणूक लढवणार म्हणून जोरदार चर्चा रंगली होती. मात्र खुद्द शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला. कुटुंबाबातील नवीन पिढीला संधी मिळावी म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे शदर पवार यांनी सांगितले होते.

नवीन पिढीला संधी मिळावी म्हणून शरद पवारांची निवडणुकीतून माघार

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)