भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरू; ‘या’ राज्यांतील उमेदवारांबाबत होणार निर्णय!

दिल्ली : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज दिल्ली येथे सुरू झाली असून या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उमेदवारांबाबत चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांसारख्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडत आहे.
आजच्या बैठकीमधून भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीद्वारे उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या लोकसभेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या राज्यांमधील खासदारकीच्या उमेदवारांबाबत निर्णय होणार असल्याचे वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)