नॉर्थ इस्ट दिल्लीतून भाजपचे मनोज तिवारी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नवी दिल्ली – दिल्ली भाजपचे अध्यक्ष आणि उत्तर पूर्व दिल्ली येथील भाजपचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार मनोज तिवारी यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

अर्ज दाखल करण्यापूर्वी रॅली काढण्यात आली होती. रॅलीमध्ये हरियाणाची पॉप्युलर डान्सर सपना चौधरी उपस्थित होती. त्यानंतर मनोज तिवारी याने अर्ज दाखल केला. यावेळी प्रदेश भाजपाचे वरिष्ठ नेते विजय गोयल, आपचे माजी नेते कपिल मिश्रा देखील उपस्थित होते.

मनोज तिवारी यांना दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित याचं आव्हान असणार आहे. मनोज तिवारी हे नॉर्थ इस्ट दिल्लीतून विद्यमान खासदार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)