नवी दिल्ली – देशात आज सकाळी 7 वाजल्यापासून लोकशाहीच्या उत्सवाला जोरदार सुरुवात झाल्याचे चित्र दिसून येत आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष आणि उत्तर पूर्व दिल्ली येथील लोकसभा निवडणुकीचे भाजप पक्षाचे उमेदवार ‘मनोज तिवारी’ यांनी देखील मतदान केंद्रावर हजेरी लावली आहे. मनोज तिवारी हे यमुना विहारमध्ये मतदान केंद्राच्या 60 व्या क्रमांकावर आहेत. मनोज तिवारी यांना काँग्रेसच्या शीला दीक्षित आणि आपचे दिलीप पांडे याचं आव्हान आहे. तिवारी हे नॉर्थ इस्ट दिल्लीतून विद्यमान खासदार आहेत.
Delhi BJP Chief & party's candidate from North-East Delhi Manoj Tiwari casts his vote at polling booth number 60 in Yamuna Vihar. He is up against Congress's Sheila Dikshit and AAP's Dilip Pandey. #LokSabhaElections2019 #Phase6 pic.twitter.com/4NWJ8ZO24e
— ANI (@ANI) May 12, 2019
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यामध्ये सात राज्यांतील 59 जागांसाठी एकूण 979 उमेदवार त्यांचे नशीब आजमावत आहेत. सहाव्या टप्यात दिल्लीतील सर्व 7 आणि हरियाणामधील सर्व 10 जागांशिवाय उत्तरप्रदेशातील 14, बिहार, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8-8 तर झारखंडमधील 4 जागांवर मतदान होत आहे. आज, अनेक बड्या नेत्यांचे भविष्य एव्हीएम मशीन मध्ये बंद होणार आहे.