राजस्थानात भाजपला 50 जागाहीं मिळणे मुष्किल : पायलट

जयपुर: राजस्थानात कॉंग्रेस पक्षच सरकार स्थापन करील असा विश्‍वास प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सचिन पायलट यांनी व्यक्‍त केला आहे. आम्हाला अगदी आरामात बहुमत मिळेल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे. लोक भाजपच्या येथील पाच वर्षाच्या राजवटीला कंटाळले आहेत असे त्यांनी म्हटले आहे. भाजपला 50 पेक्षा अधिक जागा मिळणेही अवघड आहे असा फीडबॅक आम्हाला मिळाला आहे असे ते म्हणाले. ते टोंक येथे पत्रकारांशी बोलत होते.

भारतीय जनता पक्षाच्या येथील सरकारने लोकांची साफ निराशा केली असून लोकांचा हा अनुभव आम्हाला ठिकठिकाणच्या प्रचाराच्यावेळी आल्याचेही त्यांनी सांगितले. राजस्थानात 7 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. तेथील रामगड मतदार संघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार लक्ष्मण सिंह यांचे निधन झाल्याने तेथील निवडणूक रद्द करण्यात आल्याने तेथे आता 200 ऐवजी 199 जागांवर मतदान होणार आहे.

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)