भाजपचा यात्रा सीझन सुरू 

पश्‍चिम बंगाल मध्ये काढणार तीन यात्रा 

कोलकाता: निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचा यात्रा सीझन सुरू झाला आहे. या पक्षाने पश्‍चिम बंगाल मधील आपले बस्तान विस्तारण्यासाठी त्या राज्यात तीन यात्रा आयोजित केल्या आहेत. या यात्रांतून राज्यातील सर्व 42 लोकसभा मतदार संघ कव्हर केले जाणार आहेत. प. बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की दुर्गा पुजेनंतर लगेचच आम्ही लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात करणार असून राज्याच्या विविध भागातून डिसेंबर महिन्यात रथयात्रा काढल्या जाणार आहेत.

-Ads-

यातील पहिली यात्रा 3 डिसेंबरला विरभूम जिल्ह्यातील तारापीठ येथून सुरू होईल. अमित शहा त्याचे उद्‌घाटन करतील. या यात्रांमध्ये भाजपच्या विविध राज्यांतील मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्र्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. दुसऱ्या रथयात्रेचा प्रारंभ 5 डिसेंबरला तर तिसऱ्या यात्रेचा प्रारंभ 7 डिसेंबरला होईल. प्रत्येक यात्रा 14 लोकसभा मतदार संघातून जाणार आहे असे त्यांनी सांगितले. या तिन्ही यात्रांचा समारोप मोदींच्या जाहीरसभेने कोलकाता येथे होणार आहे. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)