भाजपकडून 17 राज्यांमध्ये प्रभारींची नियुक्‍ती

नवी दिल्ली: भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीसाठी 17 राज्यांमध्ये प्रभारींची नियुक्‍ती केली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे राजस्थानची तर थावरचंद गेहलोत यांच्याकडे उत्तराखंडमधील निवडणूक प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूकीमध्ये उत्तर प्रदेशात सपा आणि बसपाच्या संभाव्य आघाडीकडून भाजपला सर्वात जास्त कडवी लढत द्यावी लागण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्‍वभुमीवर तेथे तीन प्रभारींची नियुक्‍ती करण्यात आली आहे. गुजरातमधील नेते गोवर्धन जदाफीया, पक्षाचे उपाध्यक्ष दुश्‍यंत गौतम आणि मध्य प्रदेशातील नेते नरोत्तम मिश्रा यांना राजकीय दृष्ट्या महत्वाच्या उत्तर प्रदेशातील प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भाजपचे सरचिटणीस भुपेंद्र यादव आणि अनिल जैन यांच्याकडे अनुक्रमे बिहार आणि छत्तीसगडच्या प्रचाराची जबाबदारी आहे. राज्यसभेतील सदस्य व्ही. मुरलीधरन आणि पक्षाचे सचिव देवधर राव हे आंध्र प्रभारी असणार आहेत. महेंद्र सिंह आणि ओ.पी. माथुर हे अनुक्रमे आसाम आणि गुजरातचे प्रभारी अस्णार आहेत, असे पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, मणिपूर, नागालॅन्ड, पंजाब, तेलंगणा आणि सिक्कीम यासह अन्य काही राज्यांमध्येही भाजपच्या प्रभारी आणि सह प्रभारींची नियुक्‍ती करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)