शेतकऱ्याला 4 रूपये नव्हे तर ‘इतकं’ अनुदान ! भाजपने ठरवला राष्ट्रवादीचा दावा खोटा

पुणे – माढ्यातील एका शेतकऱ्याला खरीप पीकासाठी अनुदान म्हणून सरकारकडून फक्त ४ रुपये देण्यात आले. अशाप्रकारे किरकोळ अनुदान देऊन सरकारने बळीराजाचा अपमानच केलाय अशी टीका राष्ट्रवादीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून भाजप सरकारवर केली होती.

त्यानंतर भाजपाने या ट्विटला प्रत्युत्तर दिले आहे. खोट्या बातम्यांचा आधार घेऊन अफवा पसरविणार्‍यांचे जनक आपण आहात, असं भाजपने म्हटलं आहे. यासंदर्भात भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून व्हिडीओ शेअर करत सोलापूरचे जिल्हाधिकारी यांचे म्हणणे मांडले आहे.

तसेच एक ट्विटदेखील केले आहे. ट्विटमध्ये भाजपने म्हटलं आहे की, “खोट्या बातम्यांचा आधार घेऊन अफवा पसरविणार्‍यांचे जनक आपण आहात. माढ्यातील पंडित इंगळे या शेतकर्‍याला 11 एप्रिल 2019 रोजी 1000 रू आणि 21 मे 2019 रोजी 4 रू अशा दोन टप्प्यात 1004 रू प्राप्त झाले. 4 रूपयाचा SMS दाखवून खोटे बोला पण, याबद्दल सोलापूरचे जिल्हाधिकारी यांचे म्हणणे ऐकून घ्या.”

https://twitter.com/BJP4Maharashtra/status/1131170266195750912

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)