मध्यप्रदेशात भाजपचे 177 उमेदवार जाहीर 

भोपाळ – मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 177 जागांसाठी आज पहिली यादी जाहीर केली. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान बुधानीतून लढणार आहेत.मिझोरामच्या 24, तेलंगणाच्या 28 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

काल दिवसभर भाजपाच्या दिल्ली मुख्यालयात जागावाटप आणि उमेदवारांच्या नावावरून चर्चा झाली होती. शिवराजसिंह हे यापूर्वी दोन जागांवरून निवडणूक लढणार असल्याचे वृत्त होते. मात्र, त्यांना बुधनी मतदारसंघच देण्यात आला आहे. तर शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री राहिलेली माया सिंह यांचा ग्वाल्हेर मतदारसंघातून पत्ता कापला गेला आहे. तर माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौर यांच्या गोविंदपुरा आणि माजी मंत्री कैलाश विजयवर्गीय यांच्या महू मतदारसंघाच्या उमेदवारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. व्यापम घोटाळ्यातील आरोपी आणि माजी मंत्री लक्ष्मीकांत शर्मा यांचा भा उमाकांत शर्मा यांना सिरोंजचे तिकिट देण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)