भाजपकडून अमेठीतून पुन्हा एकदा स्मृती इराणींनाच तिकीट

भाजपचे जेष्ठ नेते जे पी नड्डा यांनी आज दिल्ली येथील पक्ष मुख्यालयातून आगामी लोकसभा निवडणुकांसाठी १८२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपतर्फे सादर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या या यादीमध्ये काही नवे चेहरे वगळता पुन्हा एकदा त्याच उमेदवारांना संधी दिल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये नेहमीच प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या अमेठी मतदारसंघाची मदार यावेळी देखील भाजपतर्फे स्मृती इराणी यांच्याकडेच सोपविण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील अमेठी हा मतदारसंघ काँग्रेसचा गड असून अमेठीच्या मतदारांनी नेहमीच काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जेव्हा संपूर्ण देश मोदी लाटेवर स्वार होता तेव्हा देखील अमेठीच्या जनतेने राहुल गांधी यांच्या बाजूने कौल दिला होता. २०१४मध्ये काँग्रेसतर्फे राहुल गांधी तर भाजपतर्फे स्मृती इराणी या मतदारसंघातून एकमेकांसमोर उभे ठाकले होते. अमेठीच्या जनतेने त्या वेळी राहुल गांधींच्या पारड्यात सर्वाधिक ४ लाख मतं टाकली होती. त्यापाठोपाठ स्मृती इराणी यांना ३ लाख तर बसपाच्या धर्मेंद्र प्रताप सिंग यांना ६० हजार मतं मिळाली होती. काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या मतदारसंघातून स्मृती इराणी यांना ३ लाखांहून अधिक मतं मिळणं हे काँग्रेससाठी तस धक्कादायकच मानलं जात होत कारण यापूर्वी २००९च्या निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवारास केवळ ३७ हजार मतं मिळाली होती.

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधींना सन्मानजनक लढत देणाऱ्या स्मृती इराणी यांच्यावर भाजपने २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा विश्वास दाखवला असून यावेळी स्मृती इराणी राहुल गांधींना निस्तेनाबूत करण्यात यशस्वी ठरतात की पुन्हा एकदा अमेठीतुन काँग्रेसलाच कौल दिला जातोय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1108731409416499200

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)