निवडणुकीत बिर्याणी थाळी महागली

लोकसभेसाठी आयोगाकडून खाद्यपदार्थांपासून ते टाचणीपर्यंतचे दर निश्‍चित

नगर, दि. 19 (प्रतिनिधी) – निवडणूक म्हटले की, खर्चाला तोटा नाही. ज्याच्याकडून खर्च त्याच्यावरच कार्यकर्त्याचे लक्ष, असच काहीसे होते. खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोग दरवेळेस पुढाकार घेते. खाद्यपदार्थांचे दर जाहीर करून खर्चावर नियंत्रण ठेवले जाते. उमेदवाराने केलेल्या खर्चाचे मोजमाप करण्यासाठी निवडणूक आयोगाने दरपत्रक जाहीर केले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दरपत्रकाला काहीशी महागाईची छळ बसली आहे. निवडणूक आयोगाचा वडापाव प्रतिनग 15 रुपये, पोहे 30 रुपये, चहा 8 रुपये, मटण थाळीवर कार्यकर्त्यांनी ताव मारल्यास 240 रुपये, बिर्याणी प्लेट 205 रुपये, शाकाहारी थाळीसाठी 115 रुपये दर मोजवा लागणार आहे.
निवडणूकीत प्रत्येक उमेदवाराला आपल्या खर्चाचा हिशोब द्यावा लागतो. लोकसभा निवडणुकीत प्रत्येक लोकसभा मतदारनिहाय निवडणूक खर्चाचे दरपत्रक निश्‍चित केले जाते. या दरपत्रकाप्रमाणेच उमेदवारांना आपल्या खर्चाचा तपशील देणे बंधनकारकर आहे. उमेदवाराला खर्चाची मर्यादा सुमारे 70 लाखापर्यंत ठेवण्यात आली आहे. लोकसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाच्या दरपत्रकानुसार वडापाव आणि पॅटीस प्रत्येकी 15 रुपये, पोहे आणि उपमा प्रत्येकी 30 रुपये, चहा साधा 8 तर स्पेशल चहा 15 रुपये, शाकाहारी थाळी 100 रुपये, स्पेशल शाकाहारी थाळी 150 रुपये, अंडाकरी थाळी 90 रुपये, मटण, चिकन, मच्छी थाळी प्रत्येकी 250 रुपये, पाण्याची बाटली 15 रुपये, शीतपेय 15 रुपये या खाण्यांच्या पदार्थाबरोबर अन्य गोष्टींचे दर निश्‍चित करण्यात आले आहेत.
निवडणुकीत दरम्यान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन, भाड्याने वापरण्यात येणाऱ्या गाड्यांचे दर निश्‍चित करण्यात आले आहेत. टोपी 85 रुपये, टी-शर्ट प्रतिनग 135 रुपये, शालीचे दर 105 ते 800 रुपयापर्यंत ठेवण्यात आले आहे. मंडप, खुर्च्या हारतुऱ्यांपासून फटाक्‍यांपर्यंत दर निश्‍चित करण्यात आले आहेत. एक हजाराची माळ साडेसातशे रुपयांनी खरेदी करावी लागणार आहे.
————-
(चौकट…)
वाहन ते माईक…
कार्यकर्त्यांना फिरण्यासाठी जीप, बेलोरे, टाटा सुमो, इनोव्हा, फोर्ड आयकॉन, स्कोडा, होंडासिटी या वाहनांचे दराबरोबरच प्रचार सभांसाठी स्केअर फुटनिहाय व्यासपीठ, मंडप, मॅटिंग, यांचे तर खुर्ची, कुशन खुर्ची, ट्युबलाईट, टेबल, सोफासेट, कुलर, फॅन यांचे नगनिहाय, ध्वनिक्षेपक, माईक, ऍम्प्लिफायर यांचे देखील दर निश्‍चित केले आहे.
————-
(चौकट…)
थाळीपासून ते बुकेपर्यंत…
शुद्ध शाकाहरी थाळी 115 रुपये, स्पेशल थाळी 180 रुपये, भजी, भेळ व ढोकळा 20 रुपये, सामोसा व कचोरी 25 रुपये, प्रचारसाठी रिक्षा ध्वनिक्षेपकासह 1 हजार 900 रुपये, राऊंड बुके 100 रुपये, ट्रॅंगल बुके 150 रुपये, व्हीआयपी बुके 350 रुपये, मोठा हार तीन ते पाच हजार रुपये, बास्केट बुके 300 रुपये, क्रॅकर 750 रुपये.
————-
(चौकट…)
टाचणीपासून ट्रकपर्यंत दरपत्रक
निवडणूक काळात कार्यालयात वापरण्यात येणाऱ्या टाचणीपासून प्रचारा वापरण्यात येणाऱ्या ट्रक पर्यंतच्या खर्चाचा हिशोब दरपत्रकाप्रमाणे द्यावा लागणार आहे. ढोल वादन पथक, पोवाडे, पथनाट्य पथकाचे मानधन निश्‍चित करण्यात आले आहे. पोवाडा पथकाला व पथनाट्य पथकाला पाच हजार रुपयेपर्यंत मोजावे लागणार आहे.
———————————————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)