स्मशानात वाढदिवस साजरा करणं पडलं महागात…

संग्रहित छायाचित्र
परभणी: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या परभणी जिल्हा अध्यक्षास आपल्या मुलाचा वाढदिवस ‘स्मशानात’ साजरा करणं चांगलंच महागात पडलं आहे. अनिसच्या सदर जिल्हा अध्यक्षांवर स्मशान भूमीमध्ये वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी जिंतूर पोलिसांनी आता भारतीय दंडविधान कायद्याच्या कलम २९५ (धर्माचा अपमान होईल असे कृत्य करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पंढरीनाथ शिंदे यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस जिंतूर तहसील हद्दीतील एका स्मशान भूमीमध्ये आयोजित केला होता, वाढदिवस साजरा केल्यानंतर त्यांनी आलेल्या पाहुण्यांना माऊंसाहारी जेवण देखील दिले. याबाबत माहिती मिळताच स्थानिकांनी ‘स्मशान’ शुद्धीसाठी पुजाऱ्यांना बोलावून मंत्र व गोमूत्राद्वारे स्मशान शुद्धीकरणाचा प्रयत्न केला.
हे सर्व प्रकरण भाजपाचे जिंतूर अध्यक्ष राजेश वट्टमवार यांच्या कानावर आल्यावर त्यांनी शिंदे यांच्या विरोधात जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)