आनंदीबाई जोशी यांच्यावरील बायोपिक लवकरच

भारतातील पहिल्या महिला डॉक्‍टर आनंदीबाई जोशी यांचा प्रवास रूपेरी पडद्यावर येणार आहे. ‘आनंदी गोपाळ’ असे या सिनेमाचे नाव असून 15 फेब्रुवारी 2019 रोजी आनंदीबाईंचा जीवनप्रवास उलगडणार आहे. या सिनेमाचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज झाले.”ज्या देशास माझ्या धर्मासकट मी मान्य नाही, तो देश मला मान्य नाही’ हे उद्‌गार लिहिलेल्या या पोस्टरवर आनंदीबाई जोशी यांचे पोट्रेट दिसत आहे.

आनंदीबाई जोशी हे नाव फक्‍त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगात मोठ्या आदराने घेतले जाते. अगदी प्रतिकूल परिस्थितीत आनंदीबाई शिकल्या आणि भारतातील पहिल्या महिला डॉक्‍टर होण्याचा मान त्यांनी मिळवला. श्री. ज. जोशी यांनी ‘आनंदी गोपाळ’ यांच्यावर कादंबरी लिहिली होती. या कादंबरीवर आधारित नाटकही रंगभूमीवर आले होते. अलीकडेच गाजलेल्या “आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’मध्ये या नाटकातील दृश्‍ये बघितल्याचे प्रेक्षकांना आठवत असेल.

अगदी न कळत्या वयात म्हणजे दहाव्या वर्षी आनंदीबाईचे गोपाळराव जोशी यांच्याशी लग्न झाले. आनंदीबाईंशी लग्न केले तेव्हा गोपाळरावांनी त्यांच्या वडिलांनी एक अट घातली. मी आनंदीबाईंना माझ्या मनाप्रमाणे शिकवेन अशी अट घालून गोपाळरावांनी आनंदीबाईंशी लग्न केले. शिक्षणात अडसर नको म्हणून त्यांनी कोल्हापूरात बदली करून घेतली. कोल्हापूरमध्ये मिशनऱ्यांशी ओळख वाढल्यावर तिथे प्रथम गोपाळरावांच्या मनात आले की आनंदीला अमेरिकेला पाठवून तिचे शिक्षण करावे. पण अपमानास्पद शेरे त्यांना शिकण्याच्या कार्यात झोकून देताना खूप ऐकावे लागले. पण आनंदी तिकडे दुर्लक्ष करून आपला अभ्यास निष्ठेने करीत राहिल्या. ‘आनंदी गोपाळ’ मध्ये त्यांचा हाच प्रवास पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात आनंदीबाईंची भूमिका साकारणार कोण याचीच उत्सुकता आता सर्वांना लागून आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)