भिंतीत जिवंतपणा आणणारे बायोफिलिक (भाग-१)

ग्रीन पॉवर अर्थात हिरव्या शक्तीच्या मदतीने शहरातील ध्वनी आणि वायू प्रदूषणावर मात करणे शक्‍य आहे. सध्या हवेच्या प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे आणि ध्वनिप्रदूषणाने देखील उच्चांकी पातळी गाठली आहे. अशा स्थितीत आपल्या विचारात बदल करण्याची वेळ आली आहे. ताज्या हवेची मूलभूत गरज आणि हक्कापासून आपण वंचित राहात आहोत.

मानवाचे पुढे जाण्याचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत. मात्र, या प्रयत्नांतून आपण जगाचा चेहरामोहरा बदलला जात असून त्यात मानवाची गरजदेखील भासत नाही. अशा स्थितीत राहणीमानाला आल्हाददायक करणारे बायोफिलिक तंत्र उपयुक्त ठरत आहे. भिंतीला जिवंत करण्याचे सामर्थ्य यात आहे.

स्वत:च करा हिरवीगार भिंत
आपण स्वत:च कमी किमतीत आपल्या घराची भिंत हिरवीगार करू शकतो. त्याचा खर्च देखील कमी आहे; परंतु त्यापासून अनेक फायदे आहेत. जर आपल्या फ्लॅटमध्ये जागा कमी असेल तर बाल्कनीत अशा प्रकारची भिंत उभी करू शकतो. त्यासाठी लांब परंतु अनेक शेल्फची लाकडी फ्रेम असणे गरजेचे आहे. ही फ्रेम भिंतीजवळ ठेवता येईल आणि अनेक शेल्फच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारचे रोपटे लावता येईल. त्याचबरोबर या भिंतीत मोठ्यात मोठी खिडकीसाठी जागा ठेवा. एवढेच नाही तर लिव्हिंग रुममध्ये अशा प्रकारची खिडकी उभारता येऊ शकते. मोठी खिडकी असल्याने घरात स्वच्छ हवा वाढण्याबरोबरच सूर्याचा प्रकाशही भरपूर येऊ शकेल. याप्रमाणे बाल्कनीत तयार केलेली हिरवीगार भिंत तसेच मोठी खिडकी आपल्या घराला चांगला बायोफिलिक डिझाईन प्रदान करू शकते.

भिंतीत जिवंतपणा आणणारे बायोफिलिक (भाग-२)

अत्यंत उपयुक्त
रोपट्यांनी युक्त भिंत किंवा खिडकीसाठी वापरण्यात आलेले बायोफिलिक डिझाइन हे नैसर्गिक वातावरणनिर्मितीसाठी अनेक अर्थाने मदत करते. केवळ कॉंक्रिट, प्लॅस्टिक, काच तसेच धातूपासून तयार केलेल्या इमारतीमध्ये अशा प्रकारची भिंत घराला आकर्षक करते. घराला नवीन रूप मिळते. त्याचप्रमाणे हिरवे धन हे नैसर्गिकपणा राखण्यासाठी पोषक आहे. शहरात हरित समृद्धी वाढते आणि संपूर्ण वातावरणात त्याचा प्रभाव राहतो. अनेक रोपं ही प्रदूषित हवा रोखण्यासाठी मदतगार सिद्ध होतात. वातावरणात ऑक्‍सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि कार्बन डायऑक्‍साईड कमी करण्यासाठी अशा प्रकारची झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. झाडं ही एखाद्या ढालीप्रमाणे आपले संरक्षण करण्याचे काम करतात. हवेचे आणि आवाजाचे प्रदूषण रोखण्यासाठी झाडे उपयुक्त ठरतात. उन्हाळ्यात दिल्लीसारख्या शहरात आडोसा मिळवण्यासाठी झाडांचा शोध घ्यावा लागतो. झाडांच्या अभावामुळे तापमानात प्रचंड वाढ झालेली असते. परंतु ठिकठिकाणच्या रोपट्यांच्या लागवडीमुळे वातावरणातील उष्णता, गर्मी कमी करणे शक्‍य आहे.

– कमलेश गिरी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)