बिजू जनता दलामुळे ओडिशाचा विकास ठप्प : अमित शहा

file photo

विरोधकांना आठवड्यात रोज पंतप्रधान बदलावा लागेल

कटक – कॉंग्रेस व ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल (बीजेडी) हे पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या राज्याचा विकास करण्यात हे पक्ष अपयशी ठरले आहेत, अशी टीका भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केली. याला कॉंग्रेस, बीजेडी कारणीभूत आहेत. यूपीए सरकारने ओडिशाला 79000 कोटींचा निधी मंजूर केला तर एनडीए सरकारने 5,13,000 कोटींचा निधी दिला असेही शहा यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहा म्हणाले की, ओडिशातील जनतेने कॉंग्रेस व बीजेडीवर दाखविलेला विश्वास या पक्षांना सार्थ करून दाखविता आला नाही. आगामी विधानसभा निवडणुकांत जनतेने भाजपाला विजयी करावे. आम्ही ओडिशाला देशातील पहिल्या क्रमांकाचे प्रगत राज्य बनवू. केंद्राने राबविलेल्या आयुष्मान योजनेत सहभागी होण्यास पटनायक सरकारने नकार दिला.

यामुळे पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता ओडिशात आणखी वाढेल अशी भीती या सरकारला वाटली असावी. मात्र या संकुचित वृत्तीमुळे जनतेला केंद्राच्या योजनांचे फायदे मिळेनासे झाले आहेत. येथील लोक अतिशय कष्टाळू आहेत. तिथे अनेक संसाधनेही आहेत. मात्र तरीही राज्याचा विकास होत नाही. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना उडिया भाषा नीट येत नसल्याने ते इंग्रजीतच बोलतात, असा उल्लेख करून अमित शहा म्हणाले की, ओडिशाचा पुढचा मुख्यमंत्री नीट उडिया भाषा बोलणारा असेल.

अमित शहा यांनी विरारोधकाच्या ऐक्‍याच्या प्रयत्नावर यावेळी जोरदार टिका केली. जर देशात महाआघाडीची सत्ता आली तर सोमवारी मायावती, मंगळवारी अखिलेश, बुधवारी ममता बॅनर्जी, गुरुवारी शरद पवार, शुक्रवारी देवेगौडा, शनिवारी स्टॅलिन अशाप्रकारे दररोज पंतप्रधान बदलावा लागेल. अशी खिल्ली त्यांनी उडवली.

लोकांना या बाबी माहीत आहेत. त्यामुळे ते आघाडीला मतदान करणार नाहीत असे त्यानी सांगितले तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे मोदी व भाजपच्या विरोधात सभा घेतली होती. सभेला देशातील 20 प्रमुख राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. या सर्वांनी मोदी सरकारच्या विरोधात संघटितपणे एल्गार पुकारून हे सरकार सत्तेवरून घालवून देण्याचा निर्धार व्यक्‍त केला. यावर शहा यांनी टिका करताना सांगतिले की त्याचे एक्‍य टिकणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)